बेकायदेशीर जमाव करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी: ‘रंज्या’सह नऊ जणांवर गुन्हा
Monday, Feb 4 2019 4:43PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,pimpri chinchwad police station,wakad police station,chinchwad performing power after the flight was done on bail 1000007353

पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): जामिनावर सुटल्यानंतर चिंचवड परिसरात बेकायदेशीर जमाव करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी सराईत गुन्हेगार रंज्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी (दि. 3) चिंचवड पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

रंज्या उर्फ रणजित चव्हाण (वय 25, रा. वेताळनगर, चिंचवड) त्यांच्यासह शुभम थोरात, जित्या गायकवाड, विकी टिपले, योगेश गायकवाड, साहिल कुंभार, परश्या कांबळे, गोप्या अहिवळे, गणेश खांगटे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंज्याची 20 जानेवारी रोजी आकाश लांडगे खून प्रकरणातून जामीनावर सुटका झाली. चिंचवड परिसरात त्याची दहशत पसरवण्यासाठी रंज्याच्या कार्यकर्त्यांनी हातात दांडके, तलवारीसारखी घातक शस्त्र घेऊन त्याची पदयात्रा काढली. यावेळी रस्त्यावर उभे असलेल्या नागरिकांना येथून निघून जा, नाहीतरी तुमची सुट्टी नाहीअसे म्हणून जोरदार घोषणाबाजी केली. रंज्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

 

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी या प्रक्राराची गांभीर्याने दखल घेतल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली. चिंचवड पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. रंज्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्याला वाकड पोलिसांच्या स्वाधीन केले. वाकडमध्ये तो दोन गुन्ह्यामध्ये फरार होता. वाकड पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर रविवारी रंज्यासह त्याच्या साथीदारांवर दहशत निर्माण केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा नोंदवला. पोलीस रंज्याच्या मागे लागल्याने त्याच्या गॅंगचे सदस्य सैरभैर झाले आहेत. याचा पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.

 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004