रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला मारहाण
Monday, Feb 4 2019 5:12PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,bhosari,rikasha driver,bhosari one person beaten by his friend 1000007354

पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स):भोसरी- रिक्षा चालविण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री साडेदहाच्या सुमारास भोसरी येथे माई वडेवाले दुकानाच्या समोर घडली.

 

शंकरेश्वर साकोरे असे जखमी युवकाचे नाव आहे. याप्रकरणी संतोष मारुती साकोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हृषीकेश कदम (वय 24, रा. भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी शंकरेश्वर हे फिर्यादी संतोष यांचे भाऊ आहेत. शंकरेश्वर आणि आरोपी हृषीकेश यांच्यामध्ये रिक्षा चालविण्यावरून वाद झाला. त्यातून आरोपीने शंकरेश्वर यांच्या उजव्या गालावर, कानामागे व कल्ल्याजवळ दगडाने मारले. यामध्ये शंकरेश्वर यांचे दोन दात पडले. तसेच डाव्या पायावर मारून पायाला देखील गंभीर इजा केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004