कामासाठी बाहेर गेलेल्या एका मजुराच्या घरात दागिने,रक्कमसहित सिलेंडर देखील चोरला
Monday, Feb 4 2019 5:23PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,sangvi,piple gurav,thief,sangvi the robbers fleeced the cylinders with jewelery and cash from the laborers house 1000007355

पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): सांगवी- कामासाठी बाहेर गेलेल्या एका मजुराच्या घरात चोरी झाली. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गॅस सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 3) दुपारी पावणे एक ते अडीच वाजण्याच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.

 

बबनराव नागोराव नावळे (वय 50, रा. क्रांती चौक, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बबनराव हे मजुरीचे काम करतात. ते रविवारी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यावेळी चोरटयांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि एक गॅस सिलेंडर असा एकूण 50 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुपारी काम संपवून बबनराव घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस याचा तपास करीत आहेत.

 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142