चाकूचा धाक दाखवून एका तरुणास लुटले तर दुसऱ्यावर कोयत्याने केले वार
Monday, Feb 4 2019 5:36PM    CTNN
Tags: pimpri chinchwad ,dighi,crime,dighi one young boy looted in dighi 1000007356

 

पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): दिघी- चाकूचा धाक दाखवून तरुणाकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्ती काढून घेतले. यावेळी प्रतिकार करणाऱ्या तरुणाच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री साडेअकराच्या सुमारास आळंदी रस्त्यावर घडली.

 ओंकार अंकुश रामगंडे (वय 19, रा. ससून हॉस्टेलजवळ, पुणे) यांनी या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार हृषीकेश हनुमंत गउकर(वय 22), प्रसन्न उर्फ भावड्या मुंगसे ( दोघे रा. देहूफाटा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे रात्री मित्रांसोबत जेवण करून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. आरोपींनी ओंकार यांच्याकडील 5 हजार 400 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्याबाबत ओंकार यांच्या मित्राने जाब विचारला. यावरून चिडलेल्या आरोपी मुंगसे याने मी इथला भाई आहेअसे म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004