चिंचवड येथे दुचाकीने कट मारल्याचा कारणावरून पाच जणांना बेदम मारहाण
Monday, Feb 4 2019 5:51PM    CTNN
Tags: chinchwad,purnngar,crime,chinchwad one youth beaten by gang 1000007357

पिंपरी चिंचवड,दि.४(चेकमेट टाईम्स): दुचाकीने कट मारल्याच्या कारणावरून पाच जणांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री साडेअकराच्या सुमारास पूर्णनगर, चिंचवड येथे घडली.

 हृषीकेश सुहास तोताडे (वय 21, रा. स्पाईन सिटी, मोशी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सुनील (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोताडे हे चेतन चव्हाण, सुमित मोरे, अभय सिंग, ऋषभ जैन या मित्रांसोबत पूर्णानगर येथून जात होते. त्यावेळी समोरून दुचाकीवर आलेल्या आरोपी सुनील याने त्यांना कट मारला. याचा जाब विचारण्यासाठी तोताडे यांनी त्याला थांबवले. जाब विचारल्याचा सुनील याला राग आल्याने त्यांच्यात वाद सुरु झाला. सुनील याने त्याच्या साथीदारांना बोलावून तोताडे आणि त्यांच्या मित्रांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी तोताडे आणि चव्हाण यांना दुचाकीच्या लोखंडी चावीने मारहाण केल्याने त्यांना जबर दुखापत झाली आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 <iframe src="https://www.facebook.com/plugins/like.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fcheckmatetimes%2F&width=450&layout=standard&action=like&size=large&show_faces=true&share=true&height=80&appId=195012221238858" width="450" height="80" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allow="encrypted-media"></iframe>

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004