पुण्यात मित्रानेच केली मित्राची निर्घुण हत्या
Tuesday, Feb 5 2019 12:39PM    CTNN
Tags: pune,nrhe,abhinav college road,sr no 8,crime,murder,pune youth killed his friend over minor dispute 1000007361

पुणे,दि.५(चेकमेट टाईम्स): किरकोळ वादातून मित्रानंच मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. किरण काटकर (वय 28 वर्ष) याची मंगळवारी (5 फेब्रुवारी) पहाटे डोक्यात दगड घालून हत्या केली. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील सर्व्हे क्रमांक 8मध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेतील पत्राच्या शेडमध्ये किरणची हत्या करण्यात आली. 

 

सोमवारी रात्री किरण आणि त्याचा मित्र पप्पू पाटील हे दोघेही दारूच्या नशेत होते. यावेळेस दोघांमध्ये भाजी आणण्यावरून  वाद झाला. या वादातून पहाटेच्या सुमारास आरोपीने किरणच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली.


गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल झाले पण आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045