दोन पोलिस कर्मचारी २० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले
Sunday, Feb 17 2019 8:05AM    CTNN
Tags: pune,sasun hospital,criminal admitte,crime,policeman bribe,two policeman caught while taking bribe 1000007371

पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): न्यायालयीन कैद्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तेव्हा त्याला त्याच्या वडिलांना भेटू देण्यासाठी शिवाजीनगर मुख्यालयातील दोन कर्मचार्‍यांना 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.

 

स्वप्निल भीमराव भद्रे (वय 30) व अनोश ऑगस्टिन गायकवाड (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रे व गायकवाड हे दोघे पुणे पोलिस दलात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. पोलिस मुख्यालयात कर्तव्यास असून, त्यांची कोर्ट कंपनीत नेमणूक आहे. यातील तक्रारदार यांचा मुलगा एका गुन्ह्यात येरवडा कारागृहात आहे. त्याच्यावर झालेल्या कारवाई विरोधात त्याने कारागृहातच उपोषण सुरू केले होते. परंतु, उपोषणामुळे त्याची प्रकृती बिघडली. यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, याठिकाणी दोघांना गार्ड ड्युटी देण्यात आली होती. यातील तक्रारदार यांना त्यांच्या मुलाला भेटायचे होते. मात्र, दोघांनी भेटण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत एसीबीकडे तक्रार दिली. 

 

तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी रात्री तक्रारदार यांच्याकडून 20 हजार रुपयांची लाच घेताना भद्रे याला रंगेहाथ पकडले. त्याला लाच घेण्यासाठी गायकवाड याने मदत व लाच घेण्यासाठी प्रोत्साहित केले. 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000139