गुन्हे शाखेच्या पथकाने 50 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीस पाच वर्षांनी गजाआड केले
Sunday, Feb 17 2019 8:28AM    CTNN
Tags: pune,crime,shindewadi,after 5 years criminal arrest,after 5 year one robber has been arrested 1000007372

पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने शिंदेवाडी येथे कारचालकास धमकावून 50 लाख रुपये लुटणाऱ्या आरोपीस पाच वर्षांनी गजाआड केले. 

 

संशयित आरोपीचे नाव सुभाष लालबहाद्दूर सिंग (वय 36, रा. कात्रज) असे आहे. पुणे- सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी परिसरात 13 ऑक्‍टोबर 2010 रोजी रस्त्याने जाणारी एक कार सिंग व त्याच्या साथीदारांनी अडविली होती. त्यानंतर कारचालकाकडून त्यांनी 50 लाख रुपयांची रोकड लुटून नेली. याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सिंगचे साथीदार सोम्या मारटकर, मंदार चोरगेसह आणखी एकाला अटक केली होती. मात्र सिंग हा गेल्या पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

 

दरम्यान, पोलिस कर्मचारी अमोल पवार यांना सिंग हा कात्रज परिसरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, उपनिरीक्षक दिनेश पाटील, अजय थोरात, वैभव स्वामी, अनिल घाडगे व बाबा चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचून आरोपीस अटक केली.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004