शोरूम चालकास माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकी देवून खंडणी उकळणारे अटक
Sunday, Feb 17 2019 8:41AM    CTNN
Tags: pune,wakadewadi,crime,shoroom,two persons arrested extortion case 1000007373

पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): शोरूम चालकास माथाडी संघटनेच्या नावाखाली धमकी देऊन नव्या दुचाकी ट्रकमधून उतरविण्यासाठी खंडणी उकळणाऱ्या दोघांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी वाकडेवाडी येथे घडली होती. या प्रकरणातील अन्य तिघेजण पळून गेले आहेत. 

 

रमजान जमाल शेख (वय 27), नासीर इमामू शेख (वय 27, दोघेही, रा. पाटील इस्टेट झोपडपट्टी) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर येथील 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर वाकडेवाडी येथे दुचाकीचे शोरूम व सर्व्हिस सेंटर आहे. शोरूमसाठी विविध कंपन्यांच्या दुचाकी ट्रकने येतात; तसेच शोरूमधून अन्यत्र ट्रकमधून गाड्या पाठविल्या जातात. गाड्या चढविण्याचे व उतरविण्याचे काम त्यांचे कामगार करतात. दरम्यान, तीन महिन्यांपासून रमजान व नासीर हे दोघे शोरूममध्ये येऊन गाड्या चढविणे व उतरविण्याचे काम आपलेच माथाडी कामगार करत, दुसरे कोणी करणार नाही, अशी धमकी देत होते; तर फिर्यादी यांच्या खेड शिवापूर येथील गोदामामध्ये बुधवारी शोरूमसाठी आलेल्या गाड्या उतरविण्याचे काम सुरू होते. त्या वेळी रमजान शेख याने गाड्या भरलेला टेंपो जबरदस्तीने थांबविला. त्यातील माल आमचे माथाडी कामगार खाली करतील, नाहीतर टेंपो खाली करू देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या शोरूममध्ये गेले.

 

तिथेही फिर्यादींना "तुम्हाला एका गाडीमागे बारा हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर शोरूम फोडू' अशा शब्दांत धमकी दिली. त्यानंतर कामगारांसमोर फिर्यादी यांच्याकडून जबरदस्तीने बारा हजार रुपये हिसकावून घेतले. यामुळे घाबरून खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक एच. आर. ठाकूर तपास तपास करत आहेत.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004