कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी मालकावर गुन्हा
Sunday, Feb 17 2019 8:52AM    CTNN
Tags: pune,wanwdi,wanwadi police station,pf,pf money scam fir against owner company 1000007375

पुणे,दि.१७(चेकमेट टाईम्स): कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम (पीएफ) भविष्य निर्वाह निधी कार्यालयात न भरता 23 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी संबंधित खासगी कंपनीच्या मालकाविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

 

या प्रकरणी राकेश वासुदेव आचार्य (वय 42, रा. सहकानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून वानवडी येथील टॉप्स सिक्‍युरिटी लिमिटेड बेअरिंग कंपनीचा मालक रमेश अय्यर (रा. सांताक्रूझ, मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

आचार्य हे गोळीबार मैदान येथील भविष्य निर्वाह निधी पुणे विभागीय कार्यालयामध्ये प्रवर्तन अधिकारी आहेत. खासगी कंपन्यांकडून भविष्य निर्वाह निधी कपात होऊन येणाऱ्या रकमेवर नियंत्रण ठेवण्याचे काम ते करतात. वानवडी येथे टॉप्स सिक्‍युरिटी लिमिटेड बेअरिंग ही कंपनी आहे. ही कंपनी कामगार व अधिकाऱ्यांच्या पगारातून पीएफची रक्कम कापून घेते. कंपनीने ऑक्‍टोबर 2015 ते मार्च 2018 या कालावधीमध्ये कामगारांच्या पगारातुन पीएफचे 23 हजार 572 रुपये कापून घेतले. मात्र ही रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयात भरली नाही. 

याबाबत आचार्य यांनी कंपनीबरोबर पत्रव्यवहार करूनही त्यास प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी मालक अय्यर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक आसाराम शेटे करत आहेत. 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004