किराणा दुकानदार दुकान बंद करून घरी जात असताना कोयत्याने मारहाण
Sunday, Feb 17 2019 9:55AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,hinjawadi,crime,hinjawadi the shopkeeper threatens to kill him 1000007377

पिंपरी चिंचवड,दि.१७(चेकमेट टाईम्स): हिंजवडीकिराणा दुकानदार जेव्हा दुकान बंद करून घरी जात होता तेव्हा त्याला अडवून तीन जणांनी मिळून मारहाण केली. यामध्ये किराणा दुकानदार गंभीर जखमी झाला असून ही घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास मारुंजी येथील कॅनलजवळ घडली.याप्रकरणी मयूर अर्जुन बेडकुते (वय 19, रा. पाटीलवस्ती, नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राज भरत लोखंडे आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर यांचे मारुंजी येथे किराणा मालाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास मयूर दुकान बंद करून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. ते मारुंजी येथील कॅनलजवळ आले असता मयूर यांच्या दुचाकीला आरोपींनी त्यांची दुचाकी आडवी लावली.

 

आरोपी राज याने मयूर यांना शिवीगाळ करत लोखंडी कोयत्याने मयूर यांच्या डोक्याच्या मागील भागावर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपीच्या दोन साथीदारांनी मयूर यांना हाताने मारहाण केली. आरोपींनी मयूर यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004