महिलेला गंभीर जखमी करून तिचा निर्घृणपणे खून
Sunday, Feb 17 2019 10:55AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,dighi,crime,murder,chrholi budruk,dighi the brutal murder of an unknown woman 1000007378

पिंपरी चिंचवड,दि.१७(चेकमेट टाईम्स): दिघी- अज्ञात महिलेचा मृतदेह दिघी- च-होली बुद्रुक येथे एका शेतात आढळला . महिलेच्या शरीरावरील जखमांवरून तिचा खून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) सायंकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आली.

 

खून झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटली नसून तिचे अंदाजे वय 45 वर्ष आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक फारूक याकूब सय्यद सोलापुरे यांनी दिघी पोलीस ठाण्यात पोलिसांतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, च-होली बुद्रुक येथील बुर्डेवस्ती हिरामाता मंदिराकडे जाणा-या रस्त्याच्या कडेला महादेव बुर्डे यांचे शेत आहे. ते शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास शेतात गेले असताना त्यांना अज्ञात महिलेचा मृतदेह आढळला. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. दिघी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

 

40 ते 45 वर्ष वयाच्या महिलेच्या डोक्यावर, कपाळावर आणि छातीवर मारून तिला गंभीर जखमी करून तिचा निर्घृणपणे खून केला असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004