हुंड्याच्या पैशांसाठी विवाहितेचा छळ; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Sunday, Feb 17 2019 11:22AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,nigadi,crime,daughters husband demanded 15 lac ruppees for buying bike 1000007379

पिंपरी चिंचवड,दि.१७(चेकमेट टाईम्स): निगडी- पतीने पत्नीकडे कामाला जाण्यासाठी दुचाकी हवी तसेच  दुचाकी आणि घर घेण्यासाठी माहेरहून पंधरा लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. तसेच लग्नात जो हुंडा ठरला होता तो अजूनही मिळाला नसल्यामुळे विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बेकराईनगर हडपसर आणि यमुनानगर निगडी येथे 10 सप्टेंबर 2017 ते 12 फेब्रुवारी 2019 या कालावधीत घडली.

 

पती श्रीप्रसाद ज्ञानदेव शेंडगे (वय 25, रा. यमुनानगर, निगडी), ज्ञानदेव नामदेव शेंडगे (वय 54), अलका ज्ञानदेव शेंडगे (वय 45, दोघे रा. राजुरी, ता. पुरंदर), प्रशांत ज्ञानदेव शेंडगे (वय 28), माधुरी प्रशांत शेंडगे (वय 26, दोघे रा. बेकराईनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि आरोपी श्रीप्रसाद यांचा सप्टेंबर 2017 मध्ये विवाह झाला. लग्नामध्ये मुलीच्या वडिलांनी दोन तोळे सोन्याचे दागिने आणि पाच लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले होते. तो हुंडा मुलीच्या वडिलांनी दिला नाही. त्यामुळे आरोपींनी विवाहितेकडे हुंड्याची मागणी केली.

 

नवीन घर घेण्यासाठी तसेच श्रीप्रसाद याला कामावर जाण्यासाठी दुचाकी घेण्यासाठी पंधरा लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004