कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनीतून अॅल्युमिनियम बार चोरीला
Sunday, Feb 17 2019 12:42PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,nigadi,crime,thief,bhosari,alluminium bars robbed by theft from companys compund 1000007380

पिंपरी चिंचवड,दि.१७(चेकमेट टाईम्स): भोसरी - कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनीतून 35 हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम बार चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 15) पहाटे चारच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथे उघडकीस आली.

 

याप्रकरणी धनंजय रामचंद्र शिराळकर (वय 52, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे अॅल्युमिनिअम बारच्या स्टोअरमध्ये नोकरी करतात. शुक्रवारी रात्री कंपनी बंद केल्यानंतर पहाटे साडेतीन ते साडेचारच्या सुमारास चार इसमांनी कंपनीच्या स्टोअरचे तसेच कंपनीच्या कंपाउंडचे गज कापून कंपनी परिसरात प्रवेश केला.

 

त्यानंतर 35 हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनिअम बार चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142