पोलिसांचे अजून एक कौतुकास्पद कार्य
Monday, Feb 18 2019 10:51AM    CTNN
Tags: pune,vehicle theif,arrest,police 1000007389

पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांसमवेत राहणाऱ्या एका मुलाला पोलिसांनी वाहनचोरीच्या प्रकरणात ताब्यात घेतले. ही बातमी  शाळेत त्याच्या पोचली. अन्य विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होऊ नये, म्हणून शाळेने पुढील वर्षी त्याला प्रवेश देण्यास नकार दिला. पालकांमार्फत ही बाब पुणे पोलिसांच्या विशेष बाल पथकाला समजल्यानंतर त्यांनी संबंधित शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांनाही त्याच्या चांगल्या वागणुकीची हमी देऊन मदतीचा हात दिला. याच पद्धतीने शहरातील अनेक विधीसंघर्षित बालकांचे प्रश्‍न समजून घेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे.

 

शहरात होणाऱ्या अनेक गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी पुढाकार घेतला असून, त्यासाठी विशेष बाल पथकाने काम करण्यास सुरवात केली आहे. जामिनावर सुटलेल्या विधीसंघर्षित बालकांची पोलिस ठाण्यांच्या मार्फत बैठक घेतली जाते. त्यामध्ये विधीसंघर्षित बालक व त्यांच्या पालकांना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या जातात. त्यानंतर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून लोकांचे समुपदेशन करून प्रश्‍न सोडविला जातो. बालकाकडून पुन्हा गुन्हा घडू नये, यादृष्टीने त्याचेही सामाजिक व स्वयंसेवी संस्थेच्या समुपदेशकामार्फत समुपदेशन केले जाते. या उपक्रमावर पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, फौजदार बाळासाहेब भोर यांचे पथक काम करीत आहे.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004