कारागृह पोलिस अधिक्षक पवारांचे कृत्य आले समोर
Monday, Feb 18 2019 2:39PM    CTNN
Tags: pune,curruption,criminal,police,jail superintendent pawar money demand to gangstar marne 1000007392

पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): पुण्यातील गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना देखील त्याला न्यायालयात हजर करण्यास नकार देणार्‍या येरवडा कारागृहाचे पोलीस अधिक्षक यु. टी. पवार यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तुमच्यावर कारवाई का करण्यात येऊ नये, असेही आदेशात म्हटले आहे. 

 

शनिवारी गजा मारणेला न्यायालयात हजर करण्याचे आदेश होते. आदेशानुसार पोलिस अधिकारी केंद्रे आणि कर्मचारी आरोपीस घेण्यासाठी येरवडा कारागृहात गेले होते. परंतु, यु. टी. पवार यांनी त्यांना गजा मारणेला न्यायालयात पाठविण्यास नकार दिला. याबाबत गजा मारणे याने  पवार यांच्याकडे मला तारखेला का पाठविले नाही, अशी विचारणा केली. त्यावेळी पवार यांनी तुम्ही माझी सोय केली नाही, सांगितलेल्‍या वस्तू पाठविल्या नाही असे उत्तर दिले. 

तुला सडविण्याचे पैसे मिळतात... - कारागृहातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, यु. टी. पवार यांनी गजा मारणे याला धमकावत तुम्ही मला महिना सुरू केला नाही. तर, सांगितलेल्या वस्तूही पाठविल्या नाहीत. त्यासोबतच तसेही तुम्हाला आत सडविण्याचे आणि तुम्हाला जेलबाहेर न पाठविण्याचे पैसे मिळतात. असे सांगत गजा मारणेकडे पैशांची मागणी केली असल्याचे मारणे याच्या वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.  

 

शेकडो कैद्यांची न्यायालयात ने-आण - येरवडा कारागृहातून दररोज शेकडो कैदी न्यायालयात हजर केले जातात. केवळ वैयक्तीक द्वेषापोटी लाच मिळण्याकरिता आरोपी नैसर्गिक मुल्यांची पायमल्ली केली जात आहे, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, अधिक्षक यु. टी. पवार व त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी या अर्जाद्वारे न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004