सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
Monday, Feb 18 2019 2:49PM    CTNN
Tags: pune,balewadi,vatika socity,crime,suiside, 1000007393

पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): मुल बाळ होत नाही, तसेच गाडी, जागेसाठी माहेरहून पैसे आणण्याच्या कारणांवरून सासरच्यांकडून दिल्या जाणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बालेवाडीत समोर आली आहे. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी पतीला अटक केली असून सासू, सासरा, दिर, नणंद, अशा एकूण सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

ज्योती दिलीप म्हस्के (२५, बालेवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. तर दिलीप नाथा म्हस्के असे अटक कऱण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. सासू रामकोर नाथा म्हस्के, सासरे नाथा किसन म्हस्के, दिर मारुती नाता म्हस्के, नणंद रंजना राजू मानकर, अंजना मधुकर खऱात, सुनीता विजय बनसोडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर याप्रकऱणी मयत विवाहितेचा भाऊ संतोष दादाराव आनंदराव (२८, शिक्रापूर)यांनी फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती हिचा दिलीप म्हस्के याच्याशी विवाह झाला होता. परंतु लग्नाला दोन वर्षे उलटूनही मुल बाळ होत नसल्याने तिला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता. तसेच तिला गाडी, जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत त्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्याला कंटाळून ज्योती हिने बालेवाडी येथील वाटीका सोसायटीमध्ये असलेल्या घरी गळफास घेऊन २४ जानेवारी रोजी आत्महत्या केली. पुढील तपास चतुश्रृंगी पोलीस करत आहेत.

 

 

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000044