डेटिंगसाठी मुलगी मिळेल सांगून लुटले ३ लाख ६४ हजाराला
Monday, Feb 18 2019 3:17PM    CTNN
Tags: pune,social crime,3lakh rupees,pune hundreds of millions of people get hired to give online girl for deating 1000007395

पुणे,दि.१८(चेकमेट टाईम्स): सोशल मीडियातील लोकांक्ट (Locanto) या ऍपद्वारे डेटिंगसाठी मुलगी देण्याच्या आमिषाने बारावीत शिकणाऱ्या तरुणाला तब्बल साडेतीन लाख रुपयांनी गंडा घातल्याचे समोर आले आहे. हा तरुण पुण्यातील औंध परिसरात राहण्यास आहे.

 

याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण बारावीला शिक्षण घेत आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये त्याने लोकांक्ट (locanto) हे ऍप डाउनलोड केले होते. त्याला या ऍपवरून डेटिंगसाठी मुलगी मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी त्याच्याकडून वेळोवेळी 3 लाख 64 हजार रुपये घेण्यात आले होते.

 

इतके पैसे घेतल्यानंतरही त्याला डेटिंगसाठी मुलगी न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात तक्रार दिली. पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे अधिक तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000078