झाडू फेकून का मारला विचारत महिलेचा विनयभंग
Tuesday, Feb 19 2019 9:37AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,dapodi,crime,molistation on lady 1000007400

पिंपरी चिंचवड,दि.१९(चेकमेट टाईम्स): दापोडी - झाडू फेकून मारल्याचा जाब विचारात दोन जणांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. 18) दुपारी एकच्या सुमारास जयभीमनगर दापोडी येथे घडली.

 

शंकर चलवारे, शालन चलवारे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. जय भीमनगर, दापोडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी एकच्या सुमारास फिर्यादी महिला कपडे धुवत होत्या. त्यावेळी आरोपी शंकर दारू पिऊन आला. त्याने फिर्यादी यांना झाडू फेकून मारल्याचा जाब विचारला आणि दोन्ही आरोपींनी फिर्यादी महिलेस अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच आरोपीने महिलेचा विनयभंग केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004