कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून कॉपर आणि अॅल्युमिनियमचे साहित्य चोरीला
Tuesday, Feb 19 2019 9:51AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,bhosari,crime,thief,bhosari burglary in midc bhosari company 1000007401

पिंपरी चिंचवड,दि.१९(चेकमेट टाईम्स): भोसरी - कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्यांनी कंपनीत जॉब तयार करण्यासाठी ठेवलेले 86 हजार 500 रुपयांचे कॉपर आणि अॅल्युमिनियमचे साहित्य चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 12) उघडकीस आली. याप्रकरणी सोमवारी (दि. 18) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

राहुल बाबुलाल शहा (वय 30, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे साडेतीन ते पाच वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन आरोपी तोंडाला रुमाल व मंकी कॅप बांधून आले. त्यांनी कंपनीच्या टॉयलेटवरून कंपनीच्या वरती चढून छताचा पत्रा उचकटला. त्यानंतर कंपनीत जॉब तयार करण्यासाठी ठेवलेले कॉपर आणि अॅल्युमिनियमचे 86 हजार 500 रुपयांचे साहित्य चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142