पतीच्या रोज दारू पिऊन मारहाणीला कंटाळून पत्नीने केला पतीचा खून
Tuesday, Feb 19 2019 10:10AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,hinjawadi,crime,murder,hinjawadi police,hinjawadi wife has murdered her wife,pcmc police aayukt office 1000007402

पिंपरी चिंचवड,दि.१९(चेकमेट टाईम्स): हिंजवडी – पती रोज  दारू पिऊन मारहाण करत होता आणि  याच रागातून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा  खून  केल्याची घटना सोमवारी (दि. 18) सायंकाळी सहाच्या सुमारास पांढरे वस्ती पुनावळे येथे घडली.

 

रणविजय कुमार साह (वय 29, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रानौ गजानन निषाद (वय 24, रा. पांढरे वस्ती, पुनावळे. मूळ रा. छत्तीसगड) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तर गजानन जमुनाप्रसाद निषाद (वय 28) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि आरोपी महिला हे पती-पत्नी आहेत. ते मूळचे छत्तीसगड येथील असून रोजीरोटीच्या शोधात ते पुण्यात आले होते. पांढरे वस्ती, पुनावळे येथील कैलास हिंदुजा यांच्या जागेत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये ते राहत होते. पती वारंवार दारू पिऊन आरोपी पत्नीला मारहाण करीत असे. याचा राग मनात धरून पत्नीने पतीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000045