बेंगलोर-मुंबई महामार्गावर पुनावळे
Tuesday, Feb 19 2019 10:30AM    CTNN
Tags: baiglrul mumbai highway,thief,hinjawadi diamonds and jewelry stolen from bus 1000007403

पिंपरी चिंचवड,दि.१९(चेकमेट टाईम्स): हिंजवडी - बेंगलोर-मुंबई महामार्गावर पुनावळे येथे एका हॉटेलसमोर बस थांबली असता कार मधून आलेल्या दोघांनी बसमधून 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 14) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.

 

दीपक पुरुषोत्तमलाल सैनी (वय 24, रा. राणीगंज, सिकंदराबाद, तेलंगणा) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिकंदराबाद येथील भवानी एअर लॉजिस्टिक या कुरिअर कंपनीत मागील दोन वर्षांपासून काम करतात. ही कंपनी सोन्याचे दागिने, हिरे एका व्यापा-याकडून दुस-या व्यापा-याला कुरिअरच्या माध्यमातून पोहोचवते. एक कुरिअर घेऊन फिर्यादी सिकंदराबादहून मुंबईला खासगी ट्रॅव्हल्स बसने (के ए 41 / 7777) जात होते. गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बस पुनावळे येथे सागर हॉटेल समोर थांबली.

 

त्यावेळी एका कारमधून आलेल्या दोघांनी बसमध्ये दीपक यांच्या सीटखाली ठेवलेल्या बॅगमधील 30 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि हिरे चोरून नेले. याबाबत सोमवारी (दि. 18) हिंजवडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142