तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे विहिरीत एक अनोळखी मृतदेह
Tuesday, Feb 19 2019 12:01PM    CTNN
Tags: pimpri chinchwad,talegav dabhade,dead body,talegaon dabhade unknown deadbody found in talegaon natan colleger 1000007404

तळेगाव दाभाडे,दि.१९(चेकमेट टाईम्स): तळेगाव दाभाडे येथील नूतन इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागे असलेल्या भावे विहिरीमध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 16) सकाळी सव्वादहाच्या सुमारास उघडकीस आली. तळेगाव पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

 

अंदाजे 45-50 वर्षे वयाचा गोरा रंग असलेला हा इसम असून दाढी वाढली आहे. त्याने अंगामध्ये काळे पांढरे पट्टे असलेला टीशर्ट असून काळ्या रंगाची पँट घातलेली आहे. त्याच्या डाव्या हातामध्ये स्टीलचे कडे आहे. वरील वर्णनाच्या इसमाची माहिती कुणाला असल्यास तळेगाव पोलीस ठाण्यात 9823213822 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000091