नणंदेने वहिणीचे हात पाय बांधून तिला कोंडले घरात
Tuesday, Feb 19 2019 1:33PM    CTNN
Tags: pune,crime,yerawada,ganesh nagar,woman ties hands and legs of her brothers wife 1000007406

पुणे,दि.१९(चेकमेट टाईम्स): किरकोळ कारणावरून नणंदेने वहिणीचे हात पाय बांधून तिला घरात कोंडून ठेवल्याची घटना येरवडा येथील गणेश नगर परिसरात घडली. याप्रकऱणी नणंद व तिच्यासह आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकऱणी १९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पती आणि सासू सासरे यांच्यासोबत गणेश नगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांची नणंद रविवारी सायंकाळी घरी आली. तिच्यासोबत दोन अनोळखी व्यक्ती होत्या. तिची काही कागदपत्रे घरी आहेत. तिने वहिणीकडे त्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी तिने ते देण्यास नकार देत आई वडील आल्यावर घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे तिने वहिणीलाच शिवीगाळ करून तिचे तोंड हात पाय ओढणीने बांधले. त्यावेळी तिने आरडा ओऱडा केला. त्यानंतर घराचे दार बंद करून तिला कोंडून ते तिघे निघून गेले. काही वेळाने शेजाऱ्यांनी तिची सुटका केली. पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004