कंपनीतील कामगारांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला
Wednesday, Feb 20 2019 10:01AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,chakan,workers,criminal arrested ,chakan crime news chakan police arrested gang 1000007415

पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): चाकण - कंपनीतील कामगारांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटण्याच्या तयारी असलेल्या टोळीचा डाव चाकण पोलिसांनी उधळून लावला. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 5 लाख 5 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकणमधील आंबेठाण चौकात मंगळवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास केली.

 

निखिल रतन कांबळे (वय 19, रा. खंडोबा माळ, चाकण), ओमकार मनोज बिसनारे (वय 19, रा. चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अविनाश गंगाराम भिसे (रा. राणूबाई मळा, ता. खेड), रामदास सुखदेव घोडके (रा. आंबेडकर नगर, चाकण), महेश शिंदे (रा. रासे, ता. खेड) हे तीन आरोपी फरार आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई संदीप भीमा रावते यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आरोपी मंगळवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास स्विफ्ट कार (एम एच 12 / एल पी 5220) आणि दरोड्याचे साहित्य घेऊन चाकण मधील आंबेठाण चौकात थांबले होते. कंपनीमधून येणा-या कामगारांना चाकू आणि कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटण्याचा त्यांचा डाव होता. चाकण पोलिसांना याबाबत माहिती मिळताच आंबेठाण चौकात जाऊन आरोपींचा पाठलाग करून दोघांना पकडले. तर इतर तीनजण पळून गेले. पकडलेल्या आरोपींकडून स्विफ्ट कार, चाकू, कोयता, मोबाईल फोन, मिरची पूड असा एकूण 5 लाख 5 हजार 750 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004