माझ्यासोबत चल,मी तुझे घर चालवतो’ असे बोलून महिलेचा विनयभंग
Wednesday, Feb 20 2019 10:55AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,chikhali,crime,molistation,chikhali case lodged aginst one person of molestation 1000007416

पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स):  चिखली - माझ्यासोबत चल,मी तुझे घर चालवतोअसे बोलून महिलेचा विनयभंग करण्यात आला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी चिंचवड येथील पूर्णानगर-आरटीओ रस्त्यावर घडली.

 

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संजय वामन वावरे (रा. निगडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने जात असताना आरोपी वावरे याने त्यांचा हात पकडला. तसेच तुला किती पैसे पाहिजेत ते मी तुला देतो, तू मला खूप आवडतेस, तू खूप छान दिसतेस, माझ्यासोबत चल मी तुझे घर चालवतोअसे बोलून महिलेचा विनयभंग केला. त्यानंतरही आरोपीने महिलेचा लपून छपून पाठलाग केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004