लग्नात फक्त १० हजार हुंडा दिला म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ
Wednesday, Feb 20 2019 11:11AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,chikhali,crime,domestic voilance,domestic voilance case in chikhli police station 1000007417

 

पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): चिखली – आपल्याला लग्नात केवळ 10 हजार हुंडा दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. याप्रकरणी मंगळवारी (दि. 19) चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी 33 वर्षीच्या विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा दहा वर्षांपूर्वी आरोपीशी विवाह झाला आहे. लग्नानंतर केवळ 10 हजार रुपये हुंडा दिला. त्याव्यतिरिक्त काहीही संसार दिला नाही. दरम्यान आरोपीच्या भावाचे लग्न झाले. भावाच्या सासरकडच्या मंडळींनी लग्नात भरपूर सामान दिले. यावरून आरोपी फिर्यादी यांना वारंवार त्रास देत असे.

 

भावाच्या लग्नात त्याच्या सासरकडच्या लोकांनी संपूर्ण संसार दिला आहे.असे म्हणून आरोपीने फिर्यादी यांच्याकडे संसाराच्या सामानाचे पैसे आणण्याचा तगादा लावला. फिर्यादी यांनी यासाठी नकार दिला असता आरोपीने फिर्यादी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत
0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004