किरकोळ कारणाहून सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी
Wednesday, Feb 20 2019 11:27AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,crime,crime news in pimpri police station 1000007418

पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): धक्का लागल्याचा जाब विचारल्याने तिघांनी मिळून एकास सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना मंगळवारी (दि. 19) सायंकाळी साडेचारच्या सुमारास चिंचवड येथे घडली.

 

भीमराव दीपक सरकटे (वय 20, रा. बलदेवनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बगिरा, करण्या उर्फ किरण आणि नन्या (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरकटे चिंचवड येथील प्रीमियम प्लाझा समोरून दुचाकीवर जात असताना समोरून आलेल्या आरोपींचा त्यांना धक्का लागला. याबाबत सरकटे यांनी जाब विचारला असताना आरोपींनी त्यांचा खून करण्याची धमकी देत हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच एकाने रस्त्यावर पडलेला सिमेंटचा गट्टू सरकटे यांच्या डोक्यात मारला. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004