फ्लॅटच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून चोरी
Wednesday, Feb 20 2019 11:40AM    CTNN
Tags: pimpri chinchwad,sangvi,thief,crime 1000007419

पिंपरी चिंचवड,दि.२०(चेकमेट टाईम्स): सांगवी - फ्लॅटच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी कपाटातील 1 लाख 36 हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 17) रात्री साडेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.

 

प्रवीण जयवंत गायकवाड (वय 29, रा. सुदर्शन कॉलनी, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड रविवारी सकाळी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटात ठेवलेले 1 लाख 36 हजार रुपये किंमतीचे 7.1 टोळ्यांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. गायकवाड रात्री साडेआठच्या सुमारास घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: Pimpri Chinchwad,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000142