कुत्र्याला हटकल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार
Wednesday, Feb 20 2019 12:17PM    CTNN
Tags: pune,dog issue,attemt to murder,gang attack,pune due to a dog being hit by two dogs both arrested 1000007421

पुणे,दि.२०(चेकमेट टाईम्स): कुत्र्याला हटकल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून दोघांवर कोयत्याने वार केले. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली.

 

याप्रकरणी अजित अशोक रणदिवे (वय 25, रा़ म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे़. त्यानुसार जय संजय सपकाळ (वय 22) आणि विजय महिपत सपकाळ (वय 40) या दोघांना अटक केली. यामध्ये रणदिवे आणि सिद्धार्थ हे दोघे जखमी झाले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. 19 फेब्रुवारीच्या मध्यरात्री रणदिवे आणि त्यांचा मित्र सिद्धार्थ घायतडक हे कोरेगाव पार्क येथील साईबाबा मंदिरासमोरील रोडवरुन जात होते़. यावेळी तेथील कुत्री त्यांच्या अंगावर आली़. त्यामुळे रणदिवे यांनी त्या कुत्र्याला हाकलले़. याचाच राग आल्याने आरोपींनी या दोघांना कोयत्याने मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत.

0   
0
प्रतिक्रिया
आपली प्रतिक्रिया
Name
 
City
 
Email
   
Comment   (1000 Characters Max)  ( Press Ctrl+g to toggle between English and Hindi )

 
Reporter/Auther: News,   City: pune,   Country: India,
News Category: Crime,   Business Category: NA   Similar News ID: 1000000004