पुणे, दि. 2६ (चेकमेट टाईम्स): राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्वसामान्यांना
सामाजिक न्याय मिळावा, न्यायासनासमोर प्रत्येक व्यक्ती समान
ठरावी, यासाठी क्रांतिकारक, पुरोगामी
निर्णय घेतले. आपल्या संस्थानात सक्तीचे मोफत शिक्षण, आरक्षण,
सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
अशा समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज १४६ वी जयंती रिपब्लिकन
पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष उमेश कांबळे, विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, दत्ता गजभिरे, सुभाष बरडे, आनंद गायकवाड, उमेश वाहाळे, दिनेश तायडे , महेश पात्रे, अमित भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात शासन नियम पाळून मोजक्या मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम करण्यात आला.
आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक आणि युट्युबवर फॉलो करा
फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/