पुणे, दि. २८
(चेकमेट टाईम्स): सध्या देशभरात जिकडे तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो झळकताना
दिसतात. ती जागा कोविडचे प्रमाणपत्र असो, की पेट्रोल पंप मोदींचे छायाचित्र
पाहायलाच मिळणारच. मात्र हे फोटो लावताना काही शासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती
शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी,
सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या छायाचित्रांच्या ओळीत मोदींचे छायाचित्र
लावण्यात आलेले पाहायला मिळतात. अशाच एका शासकीय कार्यालयातील छायाचित्रांवर
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने आक्षेप नोंदवल्यानंतर तेथून पंतप्रधान नरेंद्र
मोदींचा फोटो हटवण्यात आला आहे. (आपण वरील छायाचित्रात पाहू शकता.)
झालंय असं
की, पुण्यातील पाषाण भागात महावितरणचे कार्यालय असून, त्या कार्यालयामध्ये
महापुरुषांची छायाचित्रे दर्शनी भागात लावण्यात आलेली होती. मात्र ती लावत असताना
वर्षानुवर्षे पाळला जात असलेला प्रोटोकॉल पाळला गेला नसून, त्या थोर विभूतींच्या
ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र पहिल्या स्थानावर, तर छत्रपती शिवाजी
महाराजांचे छायाचित्र शेवटच्या स्थानावर लावण्यात आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस
पार्टीचे पाषाण भागातील कार्यकर्ते समीर उत्तरकर यांच्या निदर्शनास आले. याबाबत
उत्तरकर यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, शासकीय आदेश असल्याचे अधिकाऱ्यांनी
उत्तरकर यांना सांगितल्याचे, उत्तरकर यांनी चेकमेट टाईम्सशी बोलताना सांगितले.
यानंतर समीर
उत्तरकर यांनी शांत न बसता, सनदशीर मार्गाने फेसबुक लाईव्ह आणि निवेदन देत, सदरील
महापुरुषांचा अवमान होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले. तर शासकीय कार्यालय असो,
की कोणताही पंतप्रधान प्रेमी, त्यांनी ती छायाचित्रे लावण्यास आमचा विरोध नसून, या
थोर विभूतींच्या ओळीत पंतप्रधानांचे छायाचित्र योग्य नसल्याचे त्यांनी निदर्शनास
आणून दिले. यानंतर सोशल मिडीयावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या आणि अखेर महावितरण’ला
मोदींचा फोटो महापुरुषांच्या ओळीतून काढून इतरत्र लावावा लागला आहे. यामुळे पाषाण
भागासह पुणे शहरामध्ये उत्साहाचे वातावरण असून, अशा पद्धतीने महापुरुषांचा अवमान
सहन केला जाणार नाही. ज्या कार्यालयांमध्ये अशा पद्धतीने छायाचित्रे लावली गेली
असतील, त्यांनी तातडीने चूक दुरुस्त करावी अशी मागणी उत्तरकर यांनी केली आहे.
आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप
करा ! आम्हाला फेसबुक आणि युट्युबवर फॉलो करा
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/