पुणे, दि. 2६ (चेकमेट टाईम्स): सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे गावात असलेल्या एका गोदामात
अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करून तब्बल ६५ लाख ५२ हजार १०० रुपयांचा कच्चा माल
लंपास केलाय. याबाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऱ्हे गावातील पारी कंपनीजवळ असलेल्या
कोंढाळकर इंडस्ट्रीयल इस्टेट मध्ये ललवाणी मेटॅलिक्स प्रा.लि. आणि ललवाणी फेरो
अॅलॉईज लिमिटेड कंपनीचे ऑफिस आणि गोदाम असून, मंगळवार २२ जून २०२१ सायंकाळी ६.३०
ते बुधवार २३ जून २०२१ सकाळी ७.१५ च्या दरम्यान गोदामाच्या शटरचे कुलूप तोडून
अज्ञात चोरट्याने ६५ लाख ५२ हजार १०० रुपयांचे फेरोमोली, निकेल, अॅल्युमिनियम
नॉचबार आणि निकेल मॅग्नेशियमचा कच्चा माल चोरी करून धाडसी चोरी केली.
याबाबत
ललवाणी कंपनीचे व्यवस्थापक ऋषिकेश कापरे (वय.४१ रा.वारजे, पुणे) यांनी सिंहगड रोड
पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली असून, पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले तपास करत
आहेत.
आपल्या
भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप
करा ! आम्हाला फेसबुक आणि युट्युबवर फॉलो करा
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/