पुणे, दि.१८ (चेकमेट टाईम्स): पुस्तकघर या उपक्रमाच्या माध्यमातून कर्वेनगर-वारजे परिसरातील नागरिकांमध्ये एक वाचन चळवळ सुरु करण्याचा नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत असून पुण्यातला हा पहिलाच आणि आगळावेगळा उपक्रम आहे. या उपक्रमाचे उद्घाटन शनिवार, दि. १९ जून २०२१ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत डॉ.सदानंद मोरे यांच्या हस्ते व ओपन लायब्ररी मुव्हमेंटच्या अध्यक्षा प्रियंका रंजना रामराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितित होणार आहे.
आपली घरातील जुनी पुस्तके या पुस्तक घरात आणून द्या आणि याठिकाणी उपल्बध असलेली नवीन पुस्तके मोफत वाचनाकरिता घेऊन जा. यामुळे वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यास मदत होईल आणि आपल्या सर्वांच्या ज्ञानात भर पडेल असे आवाहन लक्ष्मी दुधाने आणि स्वप्नील दुधाने यांनी केले आहे.