Type Here to Get Search Results !

सिंहगड, खडकवासला भागात विकेंड साजरा करायला आलात तर, प्रत्येकी ५०० रुपये होणार दंड


पुणे ग्रामीण पोलिसांचे नागरिकांना आव्हान

पुणे, दि.१९ (चेकमेट टाईम्स): खडकवासला येथे शनिवार, रविवार तसेच इतर दिवशी खडकवासला धरण, पानशेत, सिंहगड किल्ला परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना प्रत्येकी 500/- रुपये दंड आकारण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार सिंहगड किल्ला व आजुबाजूची पर्यटन स्थळे अद्यापही पर्यटकांसाठी बंद आहेत. मागील आठवड्यात शनिवार, रविवारी झालेली पर्यटकांची गर्दी व त्यामध्ये झालेले कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन या पार्श्वभूमीवर या आठवड्यात नियम मोडून येणाऱ्या लोकांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.