Type Here to Get Search Results !

रोनाल्डोची कोका कोलाला किक, जवळपास ३० हजार कोटींचे नुकसान???; व्हिडीओ व्हायरल

 रोनाल्डोची कोका कोलाला किक, जवळपास ३० हजार कोटींचे नुकसान???; व्हिडीओ व्हायरल 🏈

Viral Paul Pogba Removed Alcoholic Drinks After Ronaldo Removed Coca-Cola at Euro 2020

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा
पुणे, दि. १६ (चेकमेट टाईम्स): पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या
#CristianoRonaldo चाहत्यांची संख्या जगभरात आहे. जगभरातील कोट्यवधी लोक त्याला फॉलो करतात. सध्या “युरो-कप-२०२०” EuroCup2020 मध्ये पोर्तुगालच्या #Portugal पहिल्या सामन्याआधी रोनाल्डो चर्चेत आला आहे. त्याने एका पत्रकार परिषदेत केलेल्या कृतीनंतर कोका कोलाला तब्बल २९ हजार ३०० कोटींचे नुकसान झाले असल्याचे वृत्त एका वृत्तापत्राने दिले आहे. त्यात झालंय असं की, युरो-कप-२०२० च्या पत्रकार परिषदेत टेबलावर पाण्याची एक आणि कोका कोलाच्या दोन बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. ही गोष्टी रोनाल्डोला आवडली नसावी. यावेळी त्याने कोका कोलाच्या #CocaCola #Coke बाटल्या बाजूला केल्या आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या ऐवजी पाणी देण्यास सांगितले. या पत्रकार परिषदेला पोर्तुगाल संघाचे व्यवस्थापक फर्नांडो देखील उपस्थित होते. अर्थात फर्नांडो यांनी टेबलावरील कोका कोलाची बाटली हटवली नाही. पण रोनाल्डोने केलेल्या कृतीचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
#RonaldoViralVideoCocaCola #ViralVideo युरो-कप-२०२० चा कोका कोला अधिकृत स्पॉन्सर आहे. पाच युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धा खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मात्र रोनाल्डोचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोका कोलाचे शेअर्स १.६ टक्क्यांनी घसरले. त्याची किमत २४२ बिलियन डॉलरवरून २३८ बिलियन डॉलरवर आली. भारतीय रुपयात त्यांना २९ हजार ३०० कोटी रुपये एवढे होत असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले असून, पाच वेळा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या या खेळाडूवर काही कारवाई होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. Ronaldo ने Coke की बोतल हटाई, तो Coca Cola को हुआ करोड़ों का नुकसान follow us on facebook : https://www.facebook.com/checkmatetimes/ follow us on instagram : https://www.instagram.com/checkmate_times/?fbclid=IwAR3KYAHPP0t3MRS-_Vcs35pF-obf-76cpAu9Fy02YNndJCwgC2_PL4HGSYo for business or any news related inquiries email us: ctnnpune@gmail.com #CHECKMATETIMES #checkmatetimes #CheckmateTimes #चेकमेट_टाईम्स #PuneNews #NewsPune #LocalNews
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.