पुणे, दि. २४
(चेकमेट टाईम्स): सांकृतिक पुणे हे नावालाच सांस्कृतिक नसून, नेहमीच नवनवे संकल्प
करून शहराच्या संस्कृतीत भर घातली जाते. त्यापैकीच एक उपक्रम पुण्यातील पिंगळे गुरव येथे मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्यावतीने गेल्या पाच वर्षांपासून
सुरु असून, याहीवर्षी पुरुषांनी वडपौर्णिमा साजरी केली. महाराष्ट्रात पूरूषांनी
वटसावित्री साजरी करण्याचा पहिला उपक्रम राबणारी हि संस्था आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. जेष्ट
महीन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी सात प्रदक्षिणा घालून दीर्घ
आयुष्य असणाऱ्या वटवृक्षाला सूत गूंडाळूण मनोभावे पूजा करतात. सावित्रीने
सत्यवानाला यमाच्या दारातून परत आणले या कथेचे स्मरण करून वटवृक्षाची पूजा करून,"सौभाग्य मागण्याचा हा दिवस"म्हणून
साजरा केला जातो. प्रत्येक महिला वटवृक्षाप्रमाणे आपल्या
पतीला दीर्घ आयुष्य लाभावे व सात जन्मी हाच पती
परमेश्वर म्हणून मिळावा म्हणून दीर्घ आयुष्य आसणाऱ्या
वटवृक्षाची पुजा करण्याची प्रथा आहे.
या उपक्रमाबाबत बोलताना संघटनेचे आण्णा जोगदंड म्हणाले की,
महीलांनी वटवृक्षाची फांदी न तोडता प्रतिकात्मक किंवा त्या वटवृक्षाच्या जवळ जाऊन
पुजा करावी. पर्यावरणाचा समतोल राखावा पुढील पिढीला जास्तीतजास्त प्राणवायू
मिळण्यासाठी वटवृक्षाची लागवड करण्याचे त्यांनी आवाहन केले. या यंत्रयुगात पत्नी व
पती यांना समान कायद्याने आधिकार दिले आहेत. पुरूषप्रधान देशात महिला पण
पूरूषांच्या खांद्याला खांदा देउन प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहेत. मग
पुरुषांनेही जन्मोजन्मी हिच पत्नी मिळावी म्हणून वटपौर्णिमा साजरी केली तर वावगे
ठरू नये. आम्हाला सात जन्म हिच पत्नी मिळावी म्हणून आम्ही वटवृक्षाची फेऱ्या मारून
सुत घालून मनोभावे पूजा केल्याचे समाधान मिळाले असे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष
आन्ना जोगदंड यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर यांच्या
मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, मुळशी विभाग संजना करंजावणे, पश्चिम
महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड यांनी कोरोना चे सर्व नियम पाळून गर्दी न
करता साजरी केली.