The consequences of Kothrud's politics
could fall on the state's political scene; Statement by Vijay Kumbhar, Senior RTI
Activist
पुणे, दि. ७ (चेकमेट टाईम्स): भारतीय जनता
पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार असलेल्या कोथरूड
विधानसभा मतदारसंघांमध्ये पर्यायी राजकारण (Political Option in Kothrud
Vidhansabha) उभा करणे हे संघटनात्मक आव्हान आहे. डॉ अभिजीत मोरे
(Dr.Abhijeet More) यांच्या नेतृत्वाखाली कोथरूड मध्ये आम आदमी पक्ष
(Aam Aadami Party) हे आव्हान पेलत चिकाटीने संघटनात्मक बांधणी करत
आहे. कोथरुडच्या राजकारणाचे (Kothrud Pune Politics) परिणाम
हे राज्याच्या राजकीय पटलावर पडू शकतात, हे ध्यानात घेऊन संघटनात्मक कामाला अजून
गती देण्याची आवश्यकता ज्येष्ठ माहिती अधिकारी कार्यकर्ते व आप’चे प्रदेश संघटक
विजय कुंभार (RTI Activist Vijay Kumbhar) यांनी बोलून
दाखवली.
आम आदमी पक्षाच्या पौड रोड, कोथरूड येथील जहांगिर हॉस्पीटल
(पूर्वीचे जोग हॉस्पीटल) शेजारील संपर्क कार्यालयाचे (Aap Office Paud Road
Kothrud Pune) उद्घाटन विजय कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले,
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुढे बोलताना विजय कुंभार यांनी येत्या पुणे मनपा
निवडणुकीसाठी (Pune Corporation Election) कार्यकर्त्यांनी
कशी तयारी करावी याबाबत मार्गदर्शन केले. आगामी काळात पुणे शहरातील विविध
भागांमध्ये अशी जनसंपर्क कार्यालय उघडण्याचे पक्षाचे नियोजन असल्याचे सांगतानाच,
प्रामाणिक व धडाडीच्या लोकांनी राजकारणात येऊन विकासाभिमुख, जनताभिमुख
राजकीय पर्याय निर्माण करण्याची गरज कुंभार यांनी व्यक्त केली.
यावेळी पौड रस्त्यावरील आम आदमी
पक्षाच्या या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून कामाला गती मिळेल आणि जनतेच्या
समस्या सोडवल्या जातील असे मनोगत आपचे राज्य प्रवक्ते व कोथरुड विधानसभा संयोजक डॉ
अभिजीत मोरे यांनी मांडले. तर कोथरूड विधानसभा सहसंयोजक प्राध्यापक सुहास पवार
यांनी आत्तापर्यंत झालेल्या कामाचा आढावा उपस्थितांसमोर मांडला.
यावेळी अमोल बगाडे, रोहन रोकडे, राजेंद्र
वराडे, विक्रम गायकवाड, अभिजीत परदेशी,
सादिक सय्यद, महेंद्र कुंभार, रवी किरण राव, नितीन पायगुडे, रोशन
पायस, देबाशिस कुलकर्णी यांना संघटनात्मक नियुक्ती पत्रे देण्यात
आली. यावेळी आम आदमी पक्षाचे पुणे संयोजक मुकुंद किर्दत, आप
वाहतूक विंगचे राज्य संयोजक श्रीकांत आचार्य, राजकीय
विश्लेषक सतीश जोशी यांच्यासह आप’चे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
एकूणच धनदांडग्यांचा नसलेला आणि
फक्त सर्वसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने काम करत असलेला सुशिक्षितांचा आम आदमी
पक्ष आगामी २०२२ च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आव्हान उभे करेल, असे
मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत.
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम
आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/