पुणे, दि. १० (चेकमेट टाईम्स): गेले १६ महिने
कोरोना या विषाणूजन्य आजाराने आपल्या देशात / राज्यात आपली दहशत निर्माण केलेली असून
मानवाच्या तसेच देशातील उद्योग धंद्यावर अत्यंत प्रतिकूल परिणाम घडवून आणला आहे.
शिक्षण क्षेत्र हि याच्या तावडीतून सुटलेले नाही. शाळा महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, बुक स्टॉल यांची काय परिस्थिती
झालेली आहे, हे आपण पहात आहोत. अशा अवस्थेत दर्जेदार शैक्षणिक साहित्याची निर्मिती
व प्रकाशन हे आव्हानात्मक काम होऊन बसले आहे. इयत्ता १० वी सी.ई.टी. परिक्षेसाठी
याच कारणामुळे मार्गदर्शक शैक्षणिक साहित्याची कमतरता निर्माण झाली आहे. याच
पार्श्वभूमीवर ब्रिलियंट पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेच्या मार्गदर्शक शैक्षणिक साहित्याशिवाय
दुसऱ्या कोणत्याही प्रकाशन संस्थेचे साहित्य आज मार्केटमध्ये उपलब्ध नाही, असा
दावा ब्रिलियंट पब्लिकेशन करतंय.
ऑल इन वन या शीर्षकाने ब्रिलियंट
पब्लिकेशनने इयत्ता ११ वी प्रवेश सी.ई.टी. परिक्षा मार्गदर्शक पुस्तक तयार केलेले
आहे. ते मार्गदर्शक पुस्तक एसएससी, सीबीएससी, आयसीएससी. या तीनही परिक्षा मंडळातील
विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचा दावाही ब्रिलियंट पब्लिकेशन करते. गाईड
+ सराव प्रश्नपत्रिका असे मार्गदर्शक पुस्तकाचे स्वरूप आहे. यामध्ये शासनाने
निर्देशन सर्व विषयांचा गणित, विज्ञान, इंग्रजी व समाजशास्त्र या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
मार्गदर्शक पुस्तकाची रचना अशी आहे.
१. प्रत्येक प्रकरणाच्या
विषयाच्या अनुषंगाने सारांश रूपात घटक परिचय महत्वाच्या बाबींचे सारांशरूपाने स्पष्टीकरण.
२. दुसऱ्या भागात त्या त्या
प्रकरणावर आधारित २५ प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्न
सोडविण्याचा सराव होतो.
३. प्रश्न सोडविण्यासाठी
संबंधित पाठ्यघटकांचा सखोल अभ्यास करावाच लागतो.
४. स्वयं-अध्ययन व सराव या
दृष्टीकोनातून हा दुसरा भाग महत्वाचा.
५. तिसऱ्या भागात दुसऱ्या भागात
दिलेले प्रश्न व्यतिरिक्त इतर काही प्रश्न सोडवून दिलेले आहेत. त्याचाही
विद्यार्थ्यांना फायदा होतो.
६. शेवटच्या चौथ्या भागात
प्रत्येक विषयाच्या एकूण ३ प्रश्नपत्रिका या प्रत्येकी १०० गुणांच्या आहेत. त्या दिलेल्या
आहेत. एवढ्या सरावाने विद्यार्थ्याची सी.ई.टी. परिक्षेची परिपूर्ण तयारी होते व
त्याला परिक्षेत उज्वल यश मिळण्याचा दावा ब्रिलियंट पब्लिकेशन करते आहे.
ब्रिलियंट पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या
मार्गदर्शक पुस्तकाचे लेखक हे आपापल्या विषयातील तज्ञ असून अध्यापनाचा दिर्घ अनुभव
त्यांच्या पाठीशी आहे. याचा प्रत्यय विद्यार्थ्यांना अध्ययन करताना निश्चितपणे जाणवेल.
महागाईचा कडेलोट झालेला असतानाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या हाती हे
मार्गदर्शक पुस्तक देता यावे व विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा या दृष्टीकोनातून
कमीत कमी स्वागतमूल्य रू. ३००/- ठेवलेले आहे. पालक, शिक्षक विद्यार्थी
वर्गाकडून नेहमीप्रमाणे या मार्गदर्शक पुस्तकाचे स्वागत होईल अशी अपेक्षा ब्रिलियंट
पब्लिकेशनने केली आहे.
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम
आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/