Type Here to Get Search Results !

गृहप्रकल्पात फ्लॅटची बनावट विक्री करणाऱ्या चिंतामणी कंस्ट्रक्शन्सच्या महेश तिखेला अटक

 

पुणे, दि. १७ (चेकमेट टाईम्स): एकाला विकलेला फ्लॅट दुसऱ्याला विकणे, वेळेत घराचा ताबा न देता नागरिकांची फसवणूक करणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर उत्तमनगर पोलिसांनी अखेर चिंतामणी कंस्ट्रक्शन्सच्या महेश रामचंद्र तिखे (वय 57, रा. बावधन, पुणे) या बांधकाम व्यावसायिकास अटक केली आहे. याबाबत नितीन शांताराम यादव (वय 38, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे पुढील तपास करत आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन यादव यांनी चिंतामणी कंस्ट्रक्शन्सच्या शिवणे येथील भगवंतरी या गृहप्रकल्पात फ्लॅट बुक करीत, त्यासाठी 8 लाख 68 हजार रुपये देवूनही संबंधित फ्लॅट तिखे यांनी परस्पर भलत्याच व्यक्तीला विकला. ५ जानेवारी 2011 ते 28 फेब्रुवारी 2019 या कालावधीत शिवणे परिसरात ही घटना घडली. याबाबत गुन्हा दाखल होताच परिमंडळ ३ च्या उप आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनाखाली, उत्तमनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, सहायक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, पोलीस हवालदार शिवाजी दबडे, किरण देशमुख, पोलीस नाईक किरण पाटील, समीर पवार, विजय भुरूक, दत्तात्रय मालुसरे, नितीन राऊत, नलिन येरुणकर यांनी तिखे यांस शिताफीने अटक केली.

 

या प्रकरणी महेश तिखे यांना अटक करून आज शनिवार दि. 17 जुलै २०२१ न्यायालयात हजर करण्यात आले होते. उत्तमनगर पोलिस ठाण्यात अशा प्रकारच्या सुमारे सहा तक्रारी दाखल आहेत. या पार्श्वभूमीवर बुकिंग वेळी दिलेल्या पावतीचे मूळ पुस्तक जप्त करण्यासाठी, गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यासाठी, फिर्यादीने बुक केलेली सदनिका दुसऱ्या कोणाला विकली?, त्या सदनिकेचे कागदपत्रे कोठे तयार करण्यात आली?, त्याचा आणखी कोणी साथीदार आहे का?, याचा तपास करण्यासाठी तिखे याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने तिखे याला 22 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) अर्जुन बोत्रे तपास करीत आहेत.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.