Type Here to Get Search Results !

तुमच्या लसित नाही ना पाणी, इंजेक्शन तपासून घे रे गोपाला; बोगस लसीकरण करणारे गजाआड | Corona Fake Vaccination Scam

 

The hospital injected water as a vaccine for covid19

 

मुंबई, दि. ५ (चेकमेट टाईम्स): “बाजाराला विकण्या निघाली दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या गं दुधात नाही पाणी”, ही गवळण तुम्ही नक्कीच ऐकली असेल. मात्र दुधात पाणी असो किंवा नसो, तुम्ही घेतलेल्या कोविडच्या लसित पाणी तर नव्हते ना? असे म्हणायची वेळ आली आहे. त्याला कारणही तसेच असून, एका रुग्णालयाने चक्क कोविडची लस म्हणून काहीजणांना पाण्याचेच डोस दिल्याचे समोर आले आहे. (hospital injected water as a vaccine for covid19) माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य (An act that defames humanity) करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी गजाआड केले असून, पोलीस दल देखील देवदुतांकडून घडलेल्या या राक्षसी कृत्यामुळे चक्रावून गेले आहे.

 

मागील काही दिवसांपासून मुंबईत बोगस लसीकरण (Corona fake Vaccination Scam) घोटाळ्याने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या अधिकृत लशींऐवजी चक्क पाण्याचा वापर केलेल्या बोगस लस (water Saline Vaccine) नागरीकांना दिल्या जात आहेत. मुंबईत तब्बल 4 हजार नागरिकांना (Fake Vaccine Impact) या बोगस लसीकरणाचा फटका बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी बोगस लसीकरण रॅकेटचा (Mumbai Police Action) पर्दाफाश करुन आरोपींना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये हॅास्पिटलचे मालक, डॅाक्टर, वैद्यकीय संघटनेचा माजी सदस्य, हॅास्पिटलचा माजी कर्मचारी आणि एका व्यवस्थापकाचा सहभाग आहे. (Mumbai Corona Fake vaccination Scam open up lack of funds in hospital)

 

मुंबई मधील चारकोप मध्ये बोगस लसीकरणाचे गैरप्रकार सुरु होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारत सदरील हॅास्पिटल बंद केले. सदरील हॅास्पिटल 5 मार्च ते 28 एप्रिल २०२१ दरम्यान खासगी लसीकरण केंद्र होते. मात्र त्यानंतर हॅास्पिटलला खासगी लसीकरण केंद्र म्हणून बंद करण्यात आले होते, असे असतानाही हॅास्पिटल प्रशासनाकडून आगाऊ नोंदणी केलेल्या नागरिकांना पाण्याचा वापर करुन बोगस लस देण्यात आल्या. तसेच हॅास्पिटल प्रशासनाच्या संकल्पनेचे काही दुष्परिणाम होतील का? याची शहानीशा करण्यासाठी येथील डॉक्टरांच्या एका विद्यार्थ्यावर देखील लस देऊन प्रयोग करण्यात आला होता. त्या विद्यार्थ्यासह या बोगस लसीकरणात हॅास्पिटल प्रशासनाच्या डॉक्टरांना साथीदारांसह अटक करण्यात आली आहे.

 

कांदीवलीच्या काही नागरिकांना कोरोना लसीकरण प्रमाणपत्र मिळाले नाही आणि त्यांनी लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना याबाबत कळवल्यानंतर, हे प्रकरणं उघडकीस आलं आहे. २४ जून २०२१ पासून संबंधित संशयित पोलीस कोठडीत आहेत. त्या हॅास्पिटलच्या कागदपत्रांशिवाय पोलिसांना काहीच सापडलं नाहीये. आरोपी सहकाऱ्यांनी दिलेल्या जबाबावरुनच या दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात या पुराव्याला गंभीरपणे पाहिलं जात नाही, अशी माहिती या डॉक्टरांच्या वकिलांनी दिली आहे. पण जर यात सत्यता असेल तर अशा नराधमांना कठोर शासन व्हावे अशी मागणी होणे दुरापास्त नाही.

 

 

याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.