पुणे, दि. १२ (चेकमेट टाईम्स): दत्तवाडी मध्ये रविवारी सायंकाळी झालेल्या खून प्रकरणात पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने मुळशी तालुक्यातून ४ जणांना ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. त्यांना ताब्यात घेऊन दत्तवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल
शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट ३ चे पोलीस हवालदार राजेंद्र मारणे
यांना हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दत्तवाडी
मधील अक्षय कीरतकर्वे (वय 30) याच्या खून प्रकरणातील पाहिजे असलेले आरोपी हे, “बापुजी
बुवा खिंड, देवकरवाडी, मुळशी” पुणे येथे थांबले असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार अपर पोलीस आयुक्त
गुन्हे अशोक मोराळे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ
देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, पोलीस उपनिरीक्षक
दत्तात्रय काळे, पोलीस
अंमलदार दिपक मते, महेश निंबाळकर, एकनाथ
कंधारे, राजेंद्र झुंजुरके, राजेंद्र
मारणे, संतोष क्षिरसागर, हनुमंत
गायकवाड, सुजीत पवार, विल्सन डिसोझा, संदिप तळेकर, प्रकाश कट्टे, दिपक
क्षिरसागर, सोनम नेवसे, भाग्यश्री
वाघमारे यांच्या पथकाने सापळा रचून चार जणांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडे चौकशी
केली असता, त्यांनीच केल्याची कबुली दिली असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.
चारही संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेले कोयते, गाडी, कपड्यांसहीत
त्यास पुढील कारवाई करीता दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. दत्तवाडी
परिसरात रविवार दि.११ जुलै २०२१ संध्याकाळी 6.४5 वाजण्याच्या सुमारास अक्षय कीरतकर्वे
(वय 30) याचा खून झाला होता. ओंकार शिवाजी कीरतकर्वे (वय २२) याने फिर्याद दिली
आहे. अक्षय हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्याविरूद्ध विविध प्रकारचे गुन्हे दाखल
आहेत. तर निखिल बाळु बोत्रे, सुरज संजय बोत्रे, प्रविण गणपत गाडे, अमरदिप मुकुंद
भालेराव अशी या खून प्रकरणात अटक केलेल्यांची नावे आहेत.
माहिती
महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली
कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७
या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम
आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या
फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या
युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes