Type Here to Get Search Results !

चेकमेट इफेक्ट: राजयोग सोसायटी मधील त्या रस्त्याचे विरोधी पक्षनेत्यांनी केले डांबरीकरण

 

पुणे, दि. १४ (चेकमेट टाईम्स): वारजे माळवाडी (Warje Malwadi) मधील राजयोग सोसायटी (Rajyog Society) परिसरातील एक चांगला रस्ता पावसाळी वाहिन्या टाकल्यानंतर खराब झाला होता. त्यामुळे दररोज अपघात होत होते. याबाबत चेकमेट टाईम्सने २ जुलै २०२१ रोजी राजयोग मधील मनमानी पद्धतीने खराब केलेला रस्ता दुरुस्त करा हे वृत्त प्रसारित केल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेत, प्रशासनाकडून डांबरीकरण करून घेत, नागरिक, वाहनचालकांना दिलासा दिला आहे.

 

राजयोग सोसायटी परिसरातील राजयोग दत्त मंदिर (Rajyog Datta Mandir) ते सकपाळ कॉलनी (Sakpal Colony) या टप्प्यात काही दिवसांपूर्वी पावसाळी वाहिन्या टाकण्यात आल्या. मात्र त्या टाकण्यात आल्यानंतर संबंधित ठेकेदाराने सदरील रस्ता नियमाप्रमाणे पूर्ववत न करता वरवर कॉंक्रीट टाकून अर्धवट अवस्थेत सोडून दिला होता. त्यामुळे या भागात रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिलांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले होते. पुणे महानगरपालिका (Pune Corporation) प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात आला होता. त्याचबरोबर पावसाळी वाहिन्या टाकूनही रस्त्यावर पाणी साठत असल्याबाबतचे वृत्त चेकमेट टाईम्सने प्रसिद्ध केले होते.

 

यानंतर पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, माजी नगरसेवक प्रदीप उर्फ बाबा धुमाळ यांनी या वृत्ताची तातडीने दखल घेत, अधिकाऱ्यांना सूचना करून, सदरील रस्त्यावर तुकडे तुकडे पॅच न मारता, सलग डांबरीकरण करून पूर्ववत करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना येथून प्रवास करणे सुकर झाले आहे.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.