पुणे, दि. १८
(चेकमेट टाईम्स): सध्या अनेकजण सायकल चालवतानाचे फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत
असतात. ते पेट्रोलचे दर वाढल्यामुळे सायकल चालवत आहेत असे नाही, तर नागरिक
आरोग्याबाबत जागृत झालीत म्हणून सायकलची क्रेझ आली आहे. मात्र काही जणांना क्रेझ,
आरोग्याची काळजी म्हणून नाही, तर गरज म्हणून सायकल हवी असते. अशा गरजवंतांना जुनी
काय आणि नवीन काय गरजेला सायकल मिळाली हे महत्वाचे असते आणि अशांची गरज पूर्ण
करायचे काम केले आहे पुणे शहरातील वारजे- कर्वेनगर प्रभाग क्र. 31 च्या नगरसेविका
लक्ष्मी दुधाने यांनी.
यासाठी
नागरिकांनी आपल्या सोसायटी, आजूबाजूच्या परिसरातील बंद आणि नादुरुस्त
असलेल्या सायकल आम्हाला आणून द्याव्यात, असे आवाहन नगरसेविका
लक्ष्मी दुधाने आणि त्यांचे चिरंजीव, कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने
यांनी प्रभागातील नागरिकांना केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत
परिसरातील नागरिकांनी दुधाने यांच्याशी संपर्क करून नादुरुस्त आणि बंद पडलेल्या
सायकल सेवाभावनेच्या वृत्तीने दुधाणे यांच्याकडे आणून दिल्या. यावेळी ओंकार
चॅरीटेबल ट्रस्ट आणि नगरसेविका लक्ष्मी दुधाने यांनी स्व-खर्चाने एकूण 40 सायकल
दुरुस्त करून प्रभागातील वस्ती भागातील गोरगरीब, गरजू
विद्यार्थी शोधून त्या सर्व विद्यार्थ्यांना 'मदतीचा एक हात'
म्हणून दुधाने यांच्या हस्ते त्यांचे आज वितरण करण्यात आले.
यावेळी
कोथरूड विधानसभा अध्यक्ष स्वप्नील दुधाने, उपाध्यक्ष संतोष बराटे,
कोथरूड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे,
कामगार सेल अध्यक्ष राजेंद्र गायकवाड, व्हीजेएनटी
सेलचे पदाधिकारी विष्णू सरगर, प्रभाग अध्यक्ष किशोर शेडगे
विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती. मोफत सायकल भेट दिल्यानंतर या
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता ते बघून सर्व पदाधिकारी भारावून गेले.
तसेच विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
तुमच्या घरात चोरी होण्यापूर्वी ही बातमी पहा; बायकोचा फेसबूक फ्रेंड निघाला घरात चोरी करणारा चोर
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/