हजारो विद्यार्थ्यांनी एकाचवेळी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ
पुणे, दि. १५
(चेकमेट टाईम्स): फिटनेस म्हणजेच
उत्तम आरोग्याची कल्पना हळूहळू भारतात पसरत चालली आहे. वाढतं वजन, सुटलेलं पोट अशा अनेक
समस्या असतात. या समस्येपासून आपल्याला कसं दूर राहता येईल याचा विचार करून अनेक
जण जिमिंग किंवा योगासनांकडे वळतात. पण या दोन पर्यायांपेक्षा तुम्हाला वेगळं काही
हवं असेल तर झुंबा पर्यायाचा विचार करायला हरकत नाही, असा सल्ला दिलाय नगरसेविका
मंजुश्री खर्डेकर यांनी. भारतीय जनता पार्टी पुणे शहर
आणि आकांक्षा नारी मंच यांचे संयुक्त विद्यमाने मोफत झुंबा डान्स क्लासेसचे ऊदघाटन
नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी सिनेअभिनेत्री
गौरी नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले, महिला पोलीस
उपनिरीक्षक स्नेहल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर आकांक्षा नारी
मंचच्या मनीषा सचिन दांगट, अश्विनी पवार, कविता मोरे, बेबीताई दांगट, सुजाता
दांगट, हेमांगिनी पाटणकर यांच्यासह अनेक महिला भगिनी ऊपस्थित
होत्या.
यावेळी पुढे बोलताना खर्डेकर म्हणाल्या, आज कोरोना महामारीने
सर्वांनाच स्वत:चे आरोग्य सुदृढ ठेवण्याची शिकवण दिली आहे. त्याच पार्श्वभूमीवर
भारतीय जनता पार्टी प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत असून, वारजे भागातून नेहमीच
सामाजिक कार्यात आघाडीवर असलेले सचिन दांगट आणि मनीषा दांगट यांनी नेहमीप्रमाणे महिलांच्या
सुदृढ आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. हजारो रुपये फी असलेला हा क्लास महिलांसाठी
मोफत उपलब्ध करून दिलेला असून, त्याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असेही
आवाहन खर्डेकर यांनी केले आहे.
दि क्लान
फिटनेस वर्कशॅापच्या संचालिका शालिनी पिडीहा या झुंबा डान्स क्लासेस घेणार आहेत. पहिल्याच
दिवशी ५५ महिलांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. आपण आणखीन इच्छुक महिलांना सहभागी
करून घेणार आहोत. एकवेळ घरातील पुरुष आजारी पडला तर काही विशेष फरक पडत नाही.
मात्र घरातील महिला काही तासांसाठी जरी आजारी पडली तरी पूर्ण घर डळमळीत होते.
त्यामुळे आमच्या माता भगिनींचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपण सामाजिक कार्यात
आल्यापासून अव्याहतपणे कार्यरत असून, भविष्यातही असेच कार्य करत राहू. कुठलाही
बडेजाव न करता, मनापासून काम करत राहणे ही आम्हाला मिळालेली शिकवण असल्याचे
उपक्रमाचे आयोजक भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी प्रास्ताविकात
सांगितले. आकांक्षा नारी मंचच्या अध्यक्षा मनीषा सचिन दांगट यांनी उपस्थितांचे
आभार मानले.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
आमच्या इंस्टाग्राम’ची
लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/