Type Here to Get Search Results !

जन्मतःच एकच किडनी, तीही झाली निकामी; तरुणाला जगण्यासाठी समाजातील दानशुरांची गरज

 

पुणे, दि. १० (चेकमेट टाईम्स): एखाद्याला अडचणी येतात त्या अशा येतात की त्याला जगणे मुश्कील होऊन जाते. माणूस आत्महत्येला प्रवृत्त होतो. मात्र समाजात काही अशीही उदाहरणे आहेत, जी परिस्थितीसमोर हार मानत नाहीत. लढत राहतात, पण अशा लढणाऱ्याना समाजाने देखील साथ देणे आवश्यक आहे. अशीच एक तरुणाची परिस्थिती समोर आली असून, आईची म्हातारपणची काठी होण्याअगोदर त्याच्यावर परिस्थितीने आघात केला आहे. गणेश भानुदास घाटे असे त्या तरुणाचे नाव असून, आता त्याचे वय ३२ वर्षे असून, पुणे जिल्ह्याच्या, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावचा तो रहिवासी आहे.

 

वडील सुतार काम व‌ आईने शेती‌ काम‌ करुन घर प्रपंच चालवत असताना, वयाच्या विसाव्या वर्षी वडील वारलेल्या गणेश’ला जन्मत:च एक किडनी होती. मात्र तरीही तो शिक्षण, काम धंदा करत उदरनिर्वाह करत होता. मात्र निसर्गाच्या मनात काही वेगळेच होते. वयाच्या २२ व्या वर्षी गणेशची एकमेव किडनी निकामी झाली. त्याला डायलिसिसची गरज पडू लागली. गेल्या १० वर्षांपासून कर्ज काढून, नागरिक आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीने डायलिसीस केलं गेलं. मात्र आता त्याची ती एकमेव किडनी देखील निकामी झाली आहे.

 

दरम्यान आता किडनी ट्रान्सप्लांटचा निर्णय घेण्यात आलंय. त्यासाठी त्याच्या आईने तिची एक किडनी देऊ केली. आईच्या किडनीच्या टेस्ट केल्या, आईची किडनी जुळली देखील, पण म्हणतात ना नियतीच्या मनात काही वेगळच होत. ऑपरेशनला पैसे नाहीत म्हणून, ते ट्रान्सप्लांट रद्द करावं लागल आणि तिथेच माशी शिंकली. मधल्या दोन वर्षाच्या काळात काही पैसे इकडून तिकडून जमवून ऑपरेशनची प्रक्रिया सुरु केली. पुन्हा तपासण्या झाल्या आणि दुर्दैव आडव आल. गणेशच्या आईला डायबेटीसने गाठल्याचे निष्पन्न झाले आणि ती किडनी आता गणेश’ला बसवता येणार नाही असा निष्कर्ष निघाला.

 

पण गणेशची जगण्याची इच्छा आणि आईची त्याला जगवण्याची इच्छा पाहता, नशिबाने साथ दिली आहे. त्याला किडनी उपलब्ध होते आहे. मात्र आता खर्च वाढला असून, तो जवळपास १० लाख रुपयांच्या वर जातोय. शासकीय सवलती, दानशुरांची मदत यातून ५० टक्के पेक्षा अधिक रक्कम उभी राहते आहे. सद्यस्थितीला किमान ३.५ लाख (साडे तीन लाख) रुपयांची आवश्यकता आहे. आम्ही चेकमेट टाईम्सच्या माध्यमातून समाजातील सर्व दानशुराना विनंती करितो की, आपण फुल‌ ना फुलाची पाकळी म्हणून स्वेच्छेने शक्य होईल तेवढ्या रकमेची मदत गणेश घाटे याच्या बॅंक अकाऊंट मध्ये थेट जमा करावी.

 

मदत केल्यानंतर कृपया - "गणेश घाटे - किडनी ऑपरेशन मदत" -- या व्हॅटस्ऐप गृप मध्ये खाली दिलेल्या लिंक द्वारा जॉईन व्हावे हि‌ विनंती व अपेक्षा. आपण मदत केलेला स्क्रीन शॉट - रेफरन्स किंवा ट्रॅन्जॅक्शन नंबर सह, तसेच आपले नाव, गाव व‌ मोबाईल नंबर सह या ग्रुपवर पोस्ट टाकावी.

 

https://chat.whatsapp.com/JrwERjxuJ403Pyf5k64UDz

 

बॅंक माहिती डिटेल्स :-

गणेश भानुदास घाटे

Ganesh Bhanudas Ghate

 

बॅंक‌ ऑफ बडोदा

Bank of Baroda

 

अकाउंट नंबर -

Account number -

15120100006854

 

आयएफएससी कोड

IFSC Code

BARBOMANP00

 

तसेच .....

Google pay/phone pay नंबर 8485037393 वर देखील आपण थेट मदत करू शकता.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

फेसबुक लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

युट्युब लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.