Type Here to Get Search Results !

“बाई, बुब्स आणि ब्रा” या हेमांगी कवी’च्या विषयाची सुरुवात इथून झाली; नेटकरांनी भान ठेवण्याची आहे गरज

 

पुणे, दि. १४ (चेकमेट टाईम्स): कालपासून “बाई, बुब्स आणि ब्रा” या हेमांगी कवी’च्या फेसबुक पोस्टवरून सर्वत्र धुराळा उडाला आहे. मात्र याची सुरुवात कुठून झाली, हे जाणून घेतले पाहिजे. अनेकांना आणि विशेषतः आंबटशौकिनांना हा विषय तर वाळवंटातील मृगजळ वाटला. अनेकांनी ताबा सोडून ट्रोलिंग सुरु केले. पण प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे ती “आपण ज्या मातेच्या उदरी जन्म घेतला, तिनेही आपल्याला याच स्तनांमधून दुध पाजून मोठे केले आहे.”

काय गु खातो? सोशल मिडीयावर बेभान पोस्ट करणाऱ्यांवर मनसेच्या रुपाली पाटील कडाडल्या

एक अतिशय साधा पोळ्या लाटतानाचा व्हिडिओ हेमांगीने पोस्ट केला होता. त्यावर इतक्या घाणेरड्या पद्धतीने कमेंट्स आल्या. म्हणजे लोकांची जी नजर आहे, ती सुधारण्याचे नावच घेत नाही. इन्स्टाग्राम हे एक मनोरंजनाचे प्लॅटफॉर्म आहे. त्यावर वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळ्या प्रकारची गाणी घेऊन ती येत असते. त्या पोळ्या लाटण्याच्या छोट्याशा इन्स्टाग्राम पोस्टवरुन, त्याच्यावर नजर न टाकता, नको त्या गोष्टींवर बारीक रितीने पाहणं, त्यावर अश्लील लिहिणं, म्हणजे लोकांनी सगळ्या पातळ्या सोडलेल्या आहेतअशा शब्दात चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केलाय. तर रुपाली चाकणकर यांनी देखील यावर परखड भाष्य केलंय. वर्षभरापूर्वी अशाच पद्धतीने केतकी चितळे हिला ट्रोल केलं गेलं होत. काय मिळवतो आपण अशा ट्रोलिंग मधून याचा विचार करणे गरजेचे आहे.

आम्ही त्यांचे लिंग कापू; तृतीयपंथीयांच्या संतप्त प्रतिक्रीया, केतकी चितळेला ट्रोल करणाऱ्यांना इशारा

पहा हेमांगीचा तो ट्रोल झालेला इंस्टाग्राम व्हिडीओ...

केतकी चितळे प्रकरणावर बाबाराजे देशमुख काय म्हणालेत; पहा


माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

केतकी चितळे प्रकरणातील ट्रोलर्सची धरपकड सुरु; एका ट्रोलरला गजाआड करण्यात पोलिसांना यश

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. केतकी चितळे हि महाराष्ट्राची कन्या ... तेव्हा एका मुलीवर, स्त्रीवर, महिलेवर अत्यंत खालच्या हीन दर्जाचे कॉमेंट्स करणे, हे मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी माणसाला शोभत नाही, किंबहुना हे ट्रोलिंग करणारे, शिवछत्रपती महाराजांचे अनुयायी आणि मराठी संस्कृतीचे जबाबदार नागरिक असू शकतच नाही.
    अशा प्रकारे हीन दर्जाचे कॉमेंट्स करणाऱ्यांचा जाहीर निषेध 👎🏾👎🏾👎🏾
    ~ संजय भालेराव, पुणे
    8766926715
    8600991796

    उत्तर द्याहटवा