Type Here to Get Search Results !

हिंजवडी आयटीपार्क मेट्रो, रस्त्याची कामे जलद गतीने होणारः सुभाष देसाई

 


मुंबई, दि. १५ (चेकमेट टाईम्स): पुणे येथील हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या मेट्रो, रिंगरोड तसेच रस्त्याची कामे जलद गतीने पूर्ण होतील, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे व्यक्त केला. हिंजवडी आयटी पार्कला जोडणाऱ्या शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो टप्प्याचे काम संथगतीने होत असल्यामुळे आयटी पार्ककडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यावर मार्ग काढण्याची विनंती आयटी उद्योग असोसिएशनने केली. त्याच अनुषंगाने आज देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी देसाई बोलत होते. 

 

यावेळी उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, नगरविकास विभागाचे सचिव भूषण गगराणी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकारणचे सुहास दिवसे, सिटी मेट्रो रेलचे सीईओ अलोक कपुर, हिंजवडी आयटी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पै, उपाध्यक्ष सतीश मालविया आदी उपस्थित होते.

 

यामार्गावर एकूण २३ किलोमीटर अंतराचा मेट्रो प्रकल्प आहे. मागील ६ महिन्यांपासून मेट्रोची कामे प्रगतीपथावर असून पुढील १५ महिन्यांत ती पूर्ण होतील, असा विश्वास पुणे आयटी सिटी मेट्रो रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलोक कपूर यांनी व्यक्त केला. मेट्रोची कामे पूर्ण होईपर्यंत पुढील १५ महिने पर्यायी रस्ते वापरावे लागतील, त्यातील त्यातील अडथळे दूर करावेत, याशिवाय रिंग रोड आणि बाणेर रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना सुभाष देसाई यांनी केल्या.

 

दरम्यान, राज्यातील आयटी क्षेत्रातील उद्योग वाढवण्यासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे देसाई यांनी नमूद केले. हिंजवडी आयटी क्षेत्राला जोडणाऱ्या मार्गांचा मार्गातील मेट्रो कामांचा पुढील तीन महिन्यांत पुन्हा आढावा घेतला जाईल, असे बलदेव सिंग यांनी स्पष्ट केले.

 

माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!

 

आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes

आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes

आमच्या इंस्टाग्राम’ची लिंक : https://www.instagram.com/checkmate_times/


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.