शंकर खटके यांनी चार्ज घेतल्यानंतर लावलेला हा वारजे मधील दुसरा मोक्का
पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील डुक्कर खिंडीजवळ,
अन्वी ग्रीन्स येथे ५ जून २०२१ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकल
वरून आलेल्या चौघांनी स्वयंचलित पिस्टल मधून रवींद्र तागुंदे यांच्यावर ५ वेळा
गोळीबार केला होता. त्यापूर्वी एक महिना अगोदर टोळी प्रमुख नकुल खाडे याने तागुंदे
यांना ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ती न दिल्याने टोळी प्रमुख आणि त्याच्या
साथीदारांनी तागुंदे यांच्यावर गोळीबार करून चांदणी चौकाच्या दिशेने पळून गेले
होते.
यामधील
अटकेत असलेल्या अभिजित उर्फ चोख्या तुकाराम येळवंडे (वय.२४ रा.काकडे पॅलेस शेजारी,
कर्वेनगर, पुणे), उमेश श्रीराम चिकणे (वय.२८, रा.शांती नगर, कोथरूड), यांच्यासह
फरार असलेले नकुल शाम खाडे (रा.पवारनगर, जुनी सांगवी, सध्या रा. म्हाडा वसाहत,
कोथरूड) आणि चेतन चंद्रकांत पवार (रा. मेगासिटी, एसएनडीटी जवळ) यांच्यावर ही
कारवाई करण्यात आलेली आहे. या चौघांवर देखील विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल
असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.
यातील
नकुल खाडे याने स्वतःची संघटित टोळी तयार करून अपराध केले असून, यातील आरोपी यांनी
खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दंगा, घातक शस्त्राद्वारे दुखापत, गुन्ह्यांसाठी
बेकायदेशीर घातक शस्त्रे व अग्निशस्त्र बाळगून नागरिकांच्या मालमत्तेचे, वाहनांची
तोडफोड करून नुकसान करणे व नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणे, पोलिसांच्या
आदेशाचा भंग करणे, यासारखे गंभीर गुन्हे वारंवार केले आहेत. या पार्श्वभूमीवर
वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी परिमंडळ ३ च्या पोलिस
उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांचेमार्फत, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग, पुणे डॉ. संजय शिंदे यांना अहवाल पाठवला होता. त्यानुसार प्रस्तावाची
पडताळणी करून सदर गुन्ह्यास मोकाच्या कलमांचा समावेश करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्याप्रमाणे
वारजे पोलिस स्टेशनमध्ये दाखल रवींद्र तागुंदे यांच्यावर हल्ल्याच्या
गुन्ह्यांमध्ये मोका कायद्याची कलमे समाविष्ट करण्यात आलेली असून, सदरील गुन्ह्याचा
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त गजानन टोंपे हे करत आहेत.
सदरील
उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे,
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे डॉ. संजय शिंदे, परिमंडळ ३ च्या पोलीस
उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलिस
आयुक्त गजानन टोंपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके, पोलीस निरीक्षक (गुन्हे)
अमृत मराठे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस अंमलदार भीमराव पुरी, रवींद्रकुमार
कांबळे, संग्राम केंद्रे, पुंडलिक झुंबड, अरुण मोहिते, नितीन कातुर्डे, विशाल
बागुल यांच्या पथकाने केली आहे.
पुणे
शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी
नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरीरा विरुद्ध व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणारे व
लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून
गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन होईल, यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार
यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत झालेली ही ३८ वी
मोक्काची कारवाई आहे.
माहिती महत्वाची वाटत असेल तर शेअर जरूर करा. याबाबत आपली काही
प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि उपक्रमांची
माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर फक्त व्हाटस अप करा ! आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
आमच्या फेसबुक पेज’ची लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
आमच्या युट्युब’ची लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes