Sachin Dodke once
again in Khadakwasla; Responsibility of 23 newly included villages on these
corporators
पुणे, दि. 4 (चेकमेट
टाईम्स): आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (Upcoming Pune Municipal Corporation Election 2022)
पार्श्वभूमीवर नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांसाठी (23 Villages) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (NCP Pune)
पदाधिकाऱ्यांना समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. पालक प्रतिनिधी (Parent
Representative) नियुक्त होण्याअगोदर राष्ट्रवादीने मारलेला हा
चौकार म्हणजे सध्याच्या सत्ताधारी भाजपा’ने (BJP Pune)
प्यादे पुढे करण्याअगोदर चेकमेट (Checkmate) करण्याचा प्रकार
असल्याचे स्पष्ट होते आहे.
खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे,
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार चेतन तुपे,
सुनील टिंगरे (MP Supriya Sule, MP Vandana Chavan, MP Dr.
Amol Kolhe, NCP Pune City President Prashant Jagtap, MLA Chetan Tupe, MLA Sunil
Tingre) यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगरपालिकेमधील
राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवकांना (NCP Corporators Pune) या २३ गावांच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेली असून, तेथील नागरी
समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे आगामी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादीची ही सर्वात वेगवान खेळी
मानली जाते.
पुणे
शहरालगतच्या २३ गावांचा समावेश पुणे महानगरपालिकेत करण्याचा अंतिम निर्णय राज्य
सरकारने ३० जून रोजी घेतला आहे. या गावांच्या महापालिकेत समावेशाची प्रक्रिया सुरू
झाली आहे. तसेच, या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आले आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी
कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे
प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर
राष्ट्रवादीकडून जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
यात
प्रामुख्याने खडकवासला (Khadakwasla), कोपरे
(Kopare) आणि सणसनगर (Sanasnagar) गावांची
जबाबदारी नगरसेवक सचिन दोडके (Sachin Dodke) यांच्याकडे देण्यात
आली आहे. नांदेड (Nanded) गावाची जबाबदारी विरोधी पक्षनेत्या
दीपाली धुमाळ (Deepali Dhumal) यांच्याकडे, कोंढवे धावडे
(Kondhawe Dhawade) आणि नांदोशी (Nandoshi) गावांची
जबाबदारी माजी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे (Dilip Barate)
यांच्याकडे, तर सायली वांजळे (Sayali Wanjale) यांच्याकडे किरकटवाडीची
(Kirkatwadi) जबाबदारी देण्यात आली आहे.
नऱ्हे (Narhe) गावाची जबाबदारी माजी
महापौर दत्तात्रय धनकवडे (Dattatray Dhankawade) यांच्याकडे,
तर बावधन (बुद्रुक) (Bavdhan) ची जबाबदारी नगरसेवक दीपक
मानकर (Dipak Mankar), मांगडेवाडीची (MangadeWadi) जबाबदारी
प्रकाश कदम (Prakash Kadam), भिलारेवाडीची (Bhilarewadi)
जबाबदारी अमृता बाबर (Amruta Babar), गुजर निंबाळकरवाडीची
(Gujar Nimbalkarwadi) जबाबदारी विशाल तांबे (Vishal Tambe), जांभूळवाडीची (Jambhulwadi) जबाबदारी स्मिता कोंढरे (Smita
Kondhare), कोळेवाडीची (Kolewadi) जबाबदारी युवराज
बेलदरे (Youvraj Beldare), म्हाळुंगे (Mhalunge) आणि सुस (Sus) गावची जबाबदारी बाबुराव चांदेरे (Baburao
Chandere) यांच्याकडे देण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर
पिसोळीची (Pisoli) जबाबदारी
नंदा लोणकर (Nanda Lonkar),
होळकरवाडी – औताडेवाडी – हांडेवाडीची (Holakarwadi
– Autadewadi – Handewadi) जबाबदारी गणेश ढोरे (Ganesh
Dhore), वडाचीवाडीची (Wadachiwadi) जबाबदारी योगेश
ससाणे (Yogesh Sasane), शेवाळेवाडीची (Shewalewadi) जबाबदारी वैशाली बनकर (Vaishali Bankar) यांच्याकडे
देण्यात आलेली आहे.
मांजरी
(बु.) (Manjari) ची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांनी घेतली
असून, वाघोलीची (Wagholi) जबाबदारी आमदार सुनील टिंगरे यांनी
घेतली आहे. दोन्ही आमदारांना दोन महत्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायत हद्दी देण्यात
आलेल्या असून, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आमदारांवर इतरही २१ गावांसह
पूर्ण पुणे शहरात लक्ष देऊन राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून
आणण्याच्या दृष्टीने तयारी करण्याचे फर्मान राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून देण्यात आले
असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यंदा
पुणे महानगरपालिकेवर एकहाती सत्ता स्थापन होईल आणि राष्ट्रवादीचाच महापौर
(Pune Mayor) होईल यासाठी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कामाला
लागले असून, त्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार
(Ajit Pawar) यांच्या खांद्याला खांदा लावून खासदार सुप्रिया सुळे
आणि डॉ अमोल कोल्हे आणि इतरही पदाधिकारी मैदानात उतरण्याची चिन्हे स्पष्ट झाली
आहेत. राष्ट्रवादीच्या एकूणच या खेळीमुळे राष्ट्रवादी सोडून इतर पक्षांमध्ये गेलेल्यांमध्ये
चुळबुळ सुरु झाली असून, राष्ट्रवादी मधीलही काहीजणांना फोडण्यासाठी सत्ताधारी
भाजपा’ने व्यूहरचना केल्याचे समजते. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये पुणे शहरात
मोठ्या राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्यास वावगे वाटायला नको.
याबाबत
आपली काही प्रतिक्रिया असेल तर खाली कॉमेंट करू शकता. आपल्या भागातील समस्या आणि
उपक्रमांची माहिती आमच्या ९७३०३०७२२७ या क्रमांकावर व्हाटस अॅप करा ! आम्हाला
फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबवर फॉलो करा...!
फेसबुक
लिंक : https://www.facebook.com/checkmatetimes
युट्युब
लिंक : https://www.youtube.com/c/CheckmateTimes
इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/checkmate_times